सोमवार, नवंबर 14, 2005
चिमणी
Have you realised how rare it is to spot a sparrow these days? I read this poem on a sparrow and the girl in one of this years दिवाळी अंक and thought about writing it down here. The poem is by noted marathi poet ना. धो. महानोर. It tells a story of how a girl daily fed the sparrow with grains and how the sparrow had become a part of her life until one day when the sparrow was no where to be seen. Wonderful poem!

चिमणी
दररोज तिच्या खिडकीशी येते.
चिवचिव चोचीतली, मंजुळ बोलीतली...
चिमणी येताच खिडकीशी ती बहरुन असते
चिमणीसाठी अंगणात ती दाणॆ टाकते दररोज.
एवल्याशा चोचीनं, चिमणी दाणे वेचते दररोज
एकदा चिमणी अलगद तिच्या खांद्यावर आली,
चिवचिव बोलुन नकळत दूर निघून गेली.
दूर कुठे आकाशात, गजबज मेघुटात
चिमणी नंतर कधी दिसलीच नाही अंगणात
ती दररोज खिडकीशी मलूल असते अलिकडे,
चिमणीची वाट पाहात सैर भैर असते अलिकडे.
उतरत्या आषाढाची हलकीशी झिमझिम
अंगणातल्या झाडावर
तिच्या लांबसडक मोकळ्या
काळ्याभोर केसांवर
तिच्या पोक्तशा डोळ्यांच्या
काळ्पट वर्तुळांवर कुठल्या आठवणींचा वावर
दूरवर गेलेले चिमणीचे पंख
आणि ओंजळीत राहिलेले मूठभर दाणे
खिडकी सगळं पाहत असते तिचे -
खिडकीचे - तिचे संबंध आयुष्यभरचे.
-ना. धो. महानोर

चिमणी
दररोज तिच्या खिडकीशी येते.
चिवचिव चोचीतली, मंजुळ बोलीतली...
चिमणी येताच खिडकीशी ती बहरुन असते
चिमणीसाठी अंगणात ती दाणॆ टाकते दररोज.
एवल्याशा चोचीनं, चिमणी दाणे वेचते दररोज
एकदा चिमणी अलगद तिच्या खांद्यावर आली,
चिवचिव बोलुन नकळत दूर निघून गेली.
दूर कुठे आकाशात, गजबज मेघुटात
चिमणी नंतर कधी दिसलीच नाही अंगणात
ती दररोज खिडकीशी मलूल असते अलिकडे,
चिमणीची वाट पाहात सैर भैर असते अलिकडे.
उतरत्या आषाढाची हलकीशी झिमझिम
अंगणातल्या झाडावर
तिच्या लांबसडक मोकळ्या
काळ्याभोर केसांवर
तिच्या पोक्तशा डोळ्यांच्या
काळ्पट वर्तुळांवर कुठल्या आठवणींचा वावर
दूरवर गेलेले चिमणीचे पंख
आणि ओंजळीत राहिलेले मूठभर दाणे
खिडकी सगळं पाहत असते तिचे -
खिडकीचे - तिचे संबंध आयुष्यभरचे.
-ना. धो. महानोर